'सकाळ'चा कवडसा - ब्लॉगर्सचं महासंमेलन!

ब्लॉगर मित्रमैत्रीणींनो,

आपल्या मेळाव्याची नावनोंदणी अजूनही सुरूच आहे पण त्याची चर्चा फार दूरदूरपर्यंत पोहोचली आहे बरं का! ’सकाळ’ वृत्तपत्राने आपल्या ब्लॉगर मेळाव्याची दखल घेत त्यांच्या वृत्तपत्रात एक छानशी बातमी दिली आहे या मेळाव्याची.

पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या चित्रावर क्लिक करा.

बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी

नमस्कार ब्लॉगर मित्र मैत्रीणींनो,

२०११ सालातील एक मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे.

या मेळाव्यासाठी प्रत्येक सहभागी सदस्याकडून वर्गणी रू १००/- रोख अपेक्षित आहे. ही वर्गणी मेळाव्याच्या दिवशीच आयोजकांकडे जमा करता येईल. मेळाव्याची रूपरेषा, स्थळ व वेळ यांचा समन्व्य साधता यावा म्हणून जास्तीत जास्त ७५ सदस्यांनाच नावनोंदणी करू देण्याचे बंधन आयोजकांवर आहे. ज्यांना खरोखरीच मेळाव्याला येण्याची इच्छा आहे व शक्य आहे, अशा इच्छुक ब्लॉगर्स/वाचकांनीच कृपया हा फॉर्म भरावा.

७५ सदस्यांच्या नावनोंदणीनंतर उपलब्ध सभागृह व इतर बाबी विचारात घेऊन आणखी सदस्यांना नावनोंदणी करू द्यायची की नाही याचा निर्णय आयोजक घेतील. तशी स्वतंत्र नोंद येथे प्रकाशित केली जाईल.

कृपया नोंद घ्यावी -

१. एका ब्लॉगर/वाचकाला एकच फॉर्म भरता येईल. टोपणनावाने भरलेला फॉर्म रद्द केला जाईल.

२. केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच ब्लॉगर मेळाव्यात प्रवेश देण्याचे बंधन आयोजकांवर आहे. तेव्हा आपण मेळाव्यास येताना जर वाचक/मित्रपरिवार सोबत आणणार असाल, तर त्या प्रत्येक सदस्याची नोंद स्वतंत्र/नवीन फॉर्म भरून करा.

३. मेळाव्यास उपस्थित रहाणार्‍या प्रत्येक सभासदास रू. १००/- वर्गणी देणे अनिवार्य राहिल. ही वर्गणी अल्पोपहार व सभागृहाचे भाडे यासाठी घेतली जाणार आहे.

४. ब्लॉगर मेळाव्याचे चित्रीकरण वा बातमी घेण्यासाठी येणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांनी कृपया हा फॉर्म भरू नये. kbmahendra@gmail.com किंवा suhas.zele@gmail.com किंवा vishal@ranadive.net या आयडींवर स्वतंत्र व सविस्तर ईमेल करावे.

५. ७५ सदस्यांच्या नावनोंदणीनंतर फॉर्म येथून अकार्यक्षम केला जाईल व नावनोंदणीचा दुसरा टप्पा खुला केला गेल्यास फॉर्म पुन्हा कार्यक्षम केला जाईल व तशी नोंद प्रकाशित केली जाईल.

६. फॉर्म अकार्यक्षम केलेला असल्यास कुठल्याही ब्लॉगर/वाचकास आयोजकांना किंवा संयोजकांना ईमेल, बझ्झ अथवा कुठल्याही सोशल नेटवर्कवरून पाठवलेल्या संदेशाद्वारे मेळाव्यासाठी आपली नावनोंदणी करता येणार नाही.

७. मेळाव्यामधे स्वत:च्या कोणत्याही उपक्रमाची जाहिरात करण्यास आलेल्या सभसदांस जाहिरातीसाठी माईकसमोर बोलण्यास पाच मिनिटे वेळ मिळेल. जर जाहिरातदारांना स्वत:च्या उपक्रमांची हॅन्डबिल्स, पॅम्प्लेट्स, पुस्तके सभासदांमधे वाटावयाची असल्यास ते काम त्यांनी स्वत:च करावयाचे आहे.

धन्यवाद,

आपले ब्लॉगर मित्र,
महेंद्र कुलकर्णी, सुहास झेले व विशाल रणदिवे

७५ सदस्यांची नावनोंदणी पूर्ण झाल्याने फॉर्म येथून अकार्यक्षम करण्यात आला आहे.