मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी

नमस्कार ब्लॉगर मित्र मैत्रीणींनो,

२०११ सालातील एक मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे.

या मेळाव्यासाठी प्रत्येक सहभागी सदस्याकडून वर्गणी रू १००/- रोख अपेक्षित आहे. ही वर्गणी मेळाव्याच्या दिवशीच आयोजकांकडे जमा करता येईल. मेळाव्याची रूपरेषा, स्थळ व वेळ यांचा समन्व्य साधता यावा म्हणून जास्तीत जास्त ७५ सदस्यांनाच नावनोंदणी करू देण्याचे बंधन आयोजकांवर आहे. ज्यांना खरोखरीच मेळाव्याला येण्याची इच्छा आहे व शक्य आहे, अशा इच्छुक ब्लॉगर्स/वाचकांनीच कृपया हा फॉर्म भरावा.

७५ सदस्यांच्या नावनोंदणीनंतर उपलब्ध सभागृह व इतर बाबी विचारात घेऊन आणखी सदस्यांना नावनोंदणी करू द्यायची की नाही याचा निर्णय आयोजक घेतील. तशी स्वतंत्र नोंद येथे प्रकाशित केली जाईल.

कृपया नोंद घ्यावी -

१. एका ब्लॉगर/वाचकाला एकच फॉर्म भरता येईल. टोपणनावाने भरलेला फॉर्म रद्द केला जाईल.

२. केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच ब्लॉगर मेळाव्यात प्रवेश देण्याचे बंधन आयोजकांवर आहे. तेव्हा आपण मेळाव्यास येताना जर वाचक/मित्रपरिवार सोबत आणणार असाल, तर त्या प्रत्येक सदस्याची नोंद स्वतंत्र/नवीन फॉर्म भरून करा.

३. मेळाव्यास उपस्थित रहाणार्‍या प्रत्येक सभासदास रू. १००/- वर्गणी देणे अनिवार्य राहिल. ही वर्गणी अल्पोपहार व सभागृहाचे भाडे यासाठी घेतली जाणार आहे.

४. ब्लॉगर मेळाव्याचे चित्रीकरण वा बातमी घेण्यासाठी येणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांनी कृपया हा फॉर्म भरू नये. kbmahendra@gmail.com किंवा suhas.zele@gmail.com किंवा vishal@ranadive.net या आयडींवर स्वतंत्र व सविस्तर ईमेल करावे.

५. ७५ सदस्यांच्या नावनोंदणीनंतर फॉर्म येथून अकार्यक्षम केला जाईल व नावनोंदणीचा दुसरा टप्पा खुला केला गेल्यास फॉर्म पुन्हा कार्यक्षम केला जाईल व तशी नोंद प्रकाशित केली जाईल.

६. फॉर्म अकार्यक्षम केलेला असल्यास कुठल्याही ब्लॉगर/वाचकास आयोजकांना किंवा संयोजकांना ईमेल, बझ्झ अथवा कुठल्याही सोशल नेटवर्कवरून पाठवलेल्या संदेशाद्वारे मेळाव्यासाठी आपली नावनोंदणी करता येणार नाही.

७. मेळाव्यामधे स्वत:च्या कोणत्याही उपक्रमाची जाहिरात करण्यास आलेल्या सभसदांस जाहिरातीसाठी माईकसमोर बोलण्यास पाच मिनिटे वेळ मिळेल. जर जाहिरातदारांना स्वत:च्या उपक्रमांची हॅन्डबिल्स, पॅम्प्लेट्स, पुस्तके सभासदांमधे वाटावयाची असल्यास ते काम त्यांनी स्वत:च करावयाचे आहे.

धन्यवाद,

आपले ब्लॉगर मित्र,
महेंद्र कुलकर्णी, सुहास झेले व विशाल रणदिवे

७५ सदस्यांची नावनोंदणी पूर्ण झाल्याने फॉर्म येथून अकार्यक्षम करण्यात आला आहे.

16 comments:

  1. दुसऱ्या ब्लॉगर मेळाव्यास अनेक शुभेच्छा... परंतु मी येऊ शकणार नाही... :( कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडेल ह्याबद्दल शंका नाही... :)

    ReplyDelete
  2. चला.. मेळाव्याचं सूप वाजलं एकदाचं !! सही सही.. अप्रतिम.. अभिनंदन आणि शुभेच्छा..

    इथे बसून करता येण्यासारखं कुठलंही काम असेल तर निःसंकोचपणे कळवा हेसांनल !!

    ReplyDelete
  3. मुंबई बाहेरील माझ्यासारख्या लोकाना ५ जून ५:३० ते ८:३० ही वेळ थोडी गैरसोयीची आहे. जर ४ जून असती तर जास्त बरे झाले असते. पण संयोजकांनी जर पूर्ण विचार करून वेळ ठरवली असेल. तेव्हा इच्छा असूनही मला येणे जमणार नाही. मेळाव्याला शुभेच्छा

    ReplyDelete
  4. @ रोहन चौधरी,
    गेल्या वर्षी तू आयोजक होतास त्यामुळे मेळाव्याबद्दल तुला उत्सुकता असणारच. तुझी उणीव नक्की जाणवेल. मनाने तुही मेळाव्यातच रमशील याची खात्री आहे आम्हाला. तुझ्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहू देत.

    @ हेरंब,
    धन्यवाद हेरंब. तुला एक छोटसं काम करायचंच आहे मेळाव्याचं. लवकरच कळवेन.

    @ sukameva,
    धन्यवाद. मेळावा भर उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात नसावा व रविवारी ९५% कार्यालयांना सुटी असते या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन ५ जून ही तारिख निवडली आहे. अर्थात, प्रत्येकालाच हा दिवस सोयीचा पडेल असे नाही. आपण आला असतात तर मेळाव्याला आणखी शोभा आली असती

    ReplyDelete
  5. मी या मेळाव्याला येण्यास खुप उत्सुक होतो.
    मात्र तारीख आणि वेळ दोन्हीही सोयीस्कर नाही.

    कारण मी पुण्यात राहायला आहे आणि तारीख ५ जुन रविवारी येते वेळ ५.३० ते ८.३०. जी परत जाण्यासही सोयीस्कर नाही आणि दुस-या दिवशी ऑफीस आहे.

    शनिवार (४ जुन) जरी असता तरी जमले असते. रविवारी सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान जरी वेळ असती तरीही जमवले असते.

    धन्यवाद.

    ReplyDelete
  6. B.K.AHIRE
    malaa hee yetaa yeNe Shakya naahee . karaNa raatrichee veLa aahe. hardik shubhechhyaa.

    ReplyDelete
  7. दुसऱ्या ब्लॉगर मेळाव्यास अनेक शुभेच्छा....

    ReplyDelete
  8. एकुणात तिसर्‍या व मुंबईच्या दुसर्‍या मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याला मनापासून शुभेच्छा ! हा मेळावा मुंबईकरांसाठी विशेष करून असल्याने दिवस व वॆळ त्या नुसार ठरवलेली असणार हे अपेक्षित असेच आहे.

    पुढील वर्षी तो मुंबई बाहेर झाल्यास त्याचा अधिक परिणाम कारक उपयोग होईल असे वाटते , तेव्हा आत्ता पासूनच त्याच्या आंखणीस सुरुवात व्हावी !

    ReplyDelete
  9. काका, हा मेळावा मुंबईमधे होत असला तरी मुंबईबाहेरचे ब्लॉगर्स/वाचकही यात सामील होऊ शकतात. मुंबई बाहेर मेळावा घ्यायचा तर तिथल्या स्थानिक ब्लॉगर्सनी पुढाकार घ्यायला हवा. खरं तर पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा याही वर्षी होईल असं वाटत होतं.

    ReplyDelete
  10. मी तर वाटच पाहत होतो या क्षणाची.
    मी नक्की येणार.

    ReplyDelete
  11. माझा स्वत:चा व्यवसाय असल्याने आणि त्या निमित्ताने सतत इकडे-तिकडे भटकत असल्याने ५ जुन २०११ रोजी मी येऊ शकेन की नाही हे मला आत्ताच - एप्रिल महिन्यात ठरवता येणार नाही.

    तरी देखिल मी आशावादी आहे. मला जुन पहिल्या आठवड्याचे चित्र स्पष्ट झाले आणि तोवर नोंदणी थांबलेली नसली तर मी नांव नोंदवुन अवष्य येईन.

    मेळाव्यासाठी भरपुर शुभेच्छा!!

    ReplyDelete
  12. Mala ushir zala form bharayla!!!ichcha asun ani yene shakya asunahi aata yeta yenar nahi!!!!!:-(

    ReplyDelete
  13. स्पृहा, आम्ही कन्फर्मेशन साठी नोंदणी केलेल्या ब्लॉगर्सना एक ईमेल पाठवलं आहे. जर त्यांच्यापैकी कुणी येणार नसेल, असं आम्हाला ५ मे पर्यंत कळलं तर तुम्हाला ईमेल करून जागेची उपलब्धता कळवू. तुमचं ईमेल इथे दिसत नाही तेव्हा ५ मे नंतर हा ब्लॉग पुन्हा चेक करा. धन्यवाद.

    ReplyDelete
  14. ५ जुनच्या स्नेहमेळाव्यात काही कारणाने मी भाग घेवु शकलो नाही याच वाईट आजही वाटतयं. अस असलं तरी मेळाव्या बद्दल जाणुन घेण्याची उत्सुकता मनात आहेच. तेव्हा लवकरात लवकर वृतांत सादर करावा ही विनंती.

    ReplyDelete
  15. ब्लॉगर्स मेळावा बऱ्याचदा ऐकलाय पण काय असता या मेळाव्यात कुणाच ठाऊक, म्हणजे कसं आहे ना मी पहिल्यांदाच ब्लॉग लिहिला आहे ३ महिने झाले. तसा प्रतिसाद पण खूप मिळाला पण मेळावा म्हणजे नक्की काय आहे कोण सांगेल काय , आणि तसंही जोपर्यंत कोल्हापूर मध्ये मेळावा होत नाही तोपर्यंत तरी आम्हाला उपस्थित राहता येणार नाही.पण किमान माहिती तरी असावं, होय ना ?

    ReplyDelete